Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Oppo F23 5G : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार 5,000mAh बॅटरी असणारा Oppo F23 5G, सॅमसंगला देतोय टक्कर!

Oppo F23 5G : तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? परंतु तुमचे बजेट कमी आहे? तर मग काळजी करू नका. तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता Oppo F23 5G हा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे. 5,000mAh बॅटरीसह येणारा हा फोन सॅमसंगला टक्कर देत आहे. दरम्यान ओप्पोने नुकताच हा फोन लाँच केला आहे. या फोनची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे.

कंपनीने या नवीन स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन SoC दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे. या फोनमधील इनबिल्ट रॅम 16GB पर्यंत वाढवता येते. तुम्ही हा फोन बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

तसेच तुम्हाला एक्स्चेंज ऑफरद्वारे फोन मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध देण्यात आला आहे.

जाणून घ्या फीचर्स

हा फोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करतो. Oppo च्या या फोनमध्ये 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फक्त 44 मिनिटांत पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्टोरेजसाठी, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम दिली असून जी 16GB पर्यंत वाढवता येते. तर 256GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

किती आहे किंमत?

कंपनीच्या या फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर या फोनची विक्री 18 मे पासून सुरू होणार आहे.

जर तुम्ही आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डवरून पेमेंट केले तर ग्राहकांना 2,500 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. या फोनच्या मागील बाजूस 64MP, 2MP मोनो सेन्सर आणि 2MP मायक्रो सेन्सरचा पहिला कॅमेरा दिला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.