OPPO Upcoming Smartphone : शक्तिशाली फीचर्ससह लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार OPPO A1 5G, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OPPO Upcoming Smartphone : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारपेठेत कंपनीचा शक्तिशाली स्मार्टफोन लाँच होण्यास सुसज्ज झाला आहे. लवकरच भारतीय बाजारपेठेत OPPO A1 5G लाँच होणार आहे.

यापूर्वी कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन कंपनीकडून येत्या 18 मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनी यात 5,000mAh बॅटरी देणार आहे. इतकेच नाही तर कंपनी यात शानदार कॅमेरा आणि फीचर्स देणार आहे.

हा स्मार्टफोन Android 13-आधारित ColorOS 13 सह येत आहे. मात्र कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हा फोन कॅबेरिया ऑरेंज, ओशन ब्लू आणि सँडस्टोन ब्लॅक कलर पर्यायांमध्ये कंपनीने सादर केला आहे. जर याच्या स्टोरेजचा विचार केला तर Oppo A1 5G फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेजसह येत आहे.

किती असणार किंमत

भारतात Oppo A1 5G हा फोन 18 मे 2023 रोजी लॉन्च होणार आहे. हा फोन कंपनी 8GB रॅम 128GB स्टोरेजसह 20,690 रुपयांना लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीचे सिंगल वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सादर केले आहे ज्याची किंमत CNY 1,999 (सुमारे 23,800 रुपये) इतकी आहे.

कसा असणार कॅमेरा

फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा युनिटमध्‍ये LED फ्लॅश पॅनेलसह 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP सेन्सरचा समावेश असणार आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8MP चा असणार आहे

जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनीकडून यात 67W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.71-इंच फुल एचडी + (2400 × 1080) एलसीडी डिस्प्ले देण्यात येत आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz पर्यंत आहे, टच सॅम्पलिंग दर 360Hz आहे आणि पिक्सेल घनता 391 ppi आहे. डिस्प्ले 680 nits चे पीक लोकल ब्राइटनेस देते.