अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- साडेचार वर्ष गप्प बसलेल्या विरोधकांनी राहुरीच्या जनतेसाठी काय केले, याचे प्रथम आत्म परिक्षण करावे. नंतर सत्ताधारी गटावर आरोप करावे.
असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल कासार यांनी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी सत्ताधारी गटावर घणाघाती आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, उप नगराध्यक्ष सुर्यकांत भूजाडी, माजी उप नगराध्यक्ष प्रकाश भूजाडी, नगरसेवक नंदुभाऊ तनपूरे, संजय साळवे, गजानन सातभई, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, पांडूभाऊ उदावंत, संतोष आघाव आदि उपस्थित होते.
राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरिषदेने विकास कामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. विरोधक कोविडच्या काळात चार महिने घरात बसून होते. एकही दिवस कोविड सेंटरला भेट दिली नाही.
विरोधकांना बोलायला जागा नाही. निवडणूका समोर आल्या आहेत. त्यामुळे बिनबूडाचे आरोप केले जात आहे. असे नगराध्यक्ष अनिल कासार यांनी सांगितले. उप नगराध्यक्ष सुर्यकांत भूजाडी यांनी सांगितले कि, नगरपरिषद मधील सर्व कामे ठेकेदारी पद्धतीने ऑनलाईन होत आहेत.
त्यामुळे बोगस बिले काढण्याचा प्रश्नच येत नाही. कोविड सेंटरमध्ये तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही केलेली कामे सर्व जनतेला माहीत आहेत. एक तारखेपासून सात घंटागाडी नगरपरिषद हद्दीत चालू केल्या आहेत.
त्याचे कौतुक न करता विरोधक टिका करत आहेत. तसेच नगरसेवक नंदुभाऊ तनपूरे यांनी सांगितले कि, विरोधकांनी कोविड सेंटर बाबत बिन बूडाचे आरोप केले.
विरोधकांनी कोविड सेंटर सुरू करून दाखवावे. आम्ही स्वतः त्यांचे अभिनंदन करू. नगरपरिषद हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. याचीच खदखद विरोधकांना लागली आहे. निवडणूक समोर आल्याने ते बिन बूडाचे आरोप करीत आहेत.