अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- चक्रीवादळामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्र मे व जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए,
एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्राच्या १८ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान झालेल्या आयडॉलच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम आणि ८ जून ते १९ जून २०२१ दरम्यान झालेल्या तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए,
एमए शिक्षणशास्त्र व एमकॉमची नियमित व पुनर्रपरीक्षार्थीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेच्या दरम्यान चक्रीवादळामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
या परीक्षेमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग बरोबरच मुंबई,ठाणे, रायगड व पालघर येथील जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
परीक्षेत अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन लिंक विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठविली जाणार आहे. या फेरपरीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-openlearning/ या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. मे व जून २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेची विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली दिली आहे.