राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उध्यक्ष प्रविण शेलार, युवकचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, उध्दव इंगळे, पांडूरंग दरेकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळूंज, तालुका कार्याध्यक्ष श्याम जरे, श्रीगोंदा शहराध्यक्ष दिलीप लबडे, बेलवंडी गटप्रमुख संदीप साळवे, महांडूळवाडी शाखाध्यक्ष रवी महांडूळे,

सतीश श्रीराम, राकेश नवले, निलेश साळवे, दिपक कवादे, आसिफ तांबोळी, सुनिल गिलके, सुनिल रोही, अजित वराळे आदींसह शंभर युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग राष्ट्रवादीशी जोडला जात आहे.

समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार राहिला असून, विकासासाठी राष्ट्रवादी कटिबध्दपणे कार्य करीत आहे. प्रश्‍न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्‍वास निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण शेलार म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यात माजी आमदार राहुल जगताप व माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली मोठा युवक वर्ग राष्ट्रवादीशी जोडला गेला आहे. पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष बळकटीकरणासाठी गाव तेथे शाखा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन पदाधिकार्‍यांनी पक्ष वाढीसाठी सक्रीय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24