Flipkart Sale : Oppo ची शानदार ऑफर, फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय महागडा स्मार्टफोन

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन वर्षात दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही तो आता फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता. सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सेलमध्ये तुम्ही Oppo F21 Pro हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. सर्वात महत्त्वाचे या स्मार्टफोनची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे. तुम्ही तो फक्त 999 रुपयांना खरेदी करू शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Advertisement

या फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देत असून तो 90Hz च्या रीफ्रेश दर आणि 180Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 600 nits आहे. 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने हा फोन सुसज्ज आहे. तसेच तुम्हाला यामध्ये 5 GB व्हर्चुअल रॅम मिळेल, फोनची एकूण रॅम गरज पडल्यास 13 GB पर्यंत वाढते.

प्रोसेसर म्हणून, कंपनीने त्यात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. तसेच यामध्ये 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि 64-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.  सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिला आहे.

अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये तुम्हाला 4500mAh बॅटरी मिळत असून ती 33W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि वाय-फायसह सर्व मानक पर्याय दिले आहेत.

Advertisement