Oppo Find N2 Flip : ओप्पो आपले नवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता ओप्पो आपला नवीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात Oppo Find N2 Flip हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.
हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर हा फोन इतर कंपन्यांना कडवी टक्कर देईल. या पूर्वी कंपनीने हा फोनला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले होते. या नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनी 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्राइमरी कॅमेरा देणार आहे. तसेच इतर शानदार फीचर्स देणार आहे. परंतु,फोन लाँच होण्याआधी किंमत उघड झाली आहे.
इतकी आहे Oppo Find N2 फ्लिपची अपेक्षित किंमत
कंपनीचा हा फोन अगोदरच जागतिक बाजारपेठेत सादर केला आहे. फोल्डेबल फोन यूकेमध्ये 849 ब्रिटिश पाउंड्स (सुमारे 83,700 रुपये) लाँच केला आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत जवळपास 80,000 रुपये असू शकते असा दावा केला जात आहे. टिपस्टर सुधांशू अंभोरे (@Sudhanshu1414) यांनी ट्विटरवर भारतात Oppo Find N2 फ्लिपची किंमत लीक केली आहे.
टिपस्टरच्या मते, 256GB स्टोरेजसह 8GB रॅम वेरिएंटसाठी हा स्मार्टफोन 80,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर केला जाऊ शकतो. तर हा स्मार्टफोन 16 मार्चपासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येईल. इतकेच नाही तर फ्लिपकार्टवर या फोनचा लिमिटेड एडिशन पास उपलब्ध झाला आहे.
जाणून घ्या Oppo Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन
भारतात, हा फोन ग्लोबल व्हेरिएंटच्या स्पेसिफिकेशनसह ऑफर केले जाऊ शकतो. या फोनच्या ग्लोबल वेरिएंटनुसार, यामध्ये Android 13 आधारित ColorOS 13.0 आहे.कंपनीच्या या फोनमध्ये 6.8-इंचाचा LTPO AMOLED प्राथमिक डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह येत आहे.
तसेच या फोनमध्ये 3.26-इंचाचा दुय्यम OLED डिस्प्ले उपलब्ध आहे, त्याचा रिफ्रेश दर 60 Hz आहे. याच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 900 nits आहे आणि यासोबत Gorilla Glass 5 चे संरक्षण उपलब्ध आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह 512 GB स्टोरेज आणि 16 GB पर्यंत LPDDR5 रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे.
असा असणार कॅमेरा
जर या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास यात डुअल कॅमेरा सेटअप उपलब्ध करून दिला आहे, ज्यात 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्राइमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनला MariSilicon X इमेजिंग NPU चिपसेट मिळतो.
या फोनला 44W सुपर VOOC फास्ट चार्जिंग आणि 4,300mAh बॅटरी मिळत आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, फोन वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, GPS/A-GPS, USB टाइप-सी पोर्ट आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.