ताज्या बातम्या

Oppo Smartphone : Oppo च्या ‘या’ स्मार्टफोनपुढे Vivo ही फेल! कमी किमतीत मिळत आहेत शानदार फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Oppo Smartphone : ओप्पो ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी सतत आपले उत्तम फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने लवकरच आपला आगामी स्मार्टफोन OPPO Reno 8Z 5G लाँच करणार आहे.

सर्व स्मार्टफोनप्रमाणे या स्मार्टफोनमध्येही कंपनी जबरदस्त फीचर्स देईल यात शंकाच नाही. सर्वात महत्त्वाचे कंपनीचा हा स्मार्टफोन विवोलाही टक्कर देत आहे. त्यामुळे या फोनमध्ये काय फीचर्स असणार? त्याची किंमत किती ते जाणून घेऊयात.

काय आहे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स?

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह दिला असून स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर आणि Galaxy S21 प्रमाणे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल या फोनचे असणार आहे. तसेच यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 64MP मुख्य सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

पॉवरसाठी, यात 4,500mAh ची मजबूत बॅटरी कंपनीने दिली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम सपोर्ट, 5जी, वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक दिले आहे.

किती आहे किंमत

हा स्मार्टफोन डॉनलाइट गोल्ड आणि स्टारलाईट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असून कंपनीने ते 2,440 युआनच्या किंमतीसह बाजारात उपलब्ध केले आहे, जे भारतीय चलनात 28,627 रुपये इतकी आहे.

Ahmednagarlive24 Office