सत्ता हातून जाण्याच्या भीतीने, विरोधकांचे “सरपंच राजीनामा नाट्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर तालुक्यातील शहापूर-केकती येथील ग्रामपंचायत येथील सैनिक नगर, यशवंत नगर, शेळके वस्ती येथील सरपंच दत्तात्रय उर्फ देवराज भालसिंग यांच्या विरुद्ध विरोधकांनी बनावट अर्ज तयार करून सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे भासवून

सोशल मीडियाद्वारे वायरल करण्यात आले ही माहिती गावकऱ्यांना माहित पडतात संपूर्ण गाव एक जुटीने या घटनेचा विरोध करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे आले असता तेथे सत्य माहिती कळाल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी निषेध व्यक्त करून सरपंच यांचा राजीनामा देण्यात आलेला नसून

हा विरोधकांचा डाव असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायत ही ३० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेली केकती -शहापूर ग्रामपंचायत, काही काळापूर्वी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी होऊन सरपंचपदी निवडून आलेल्या देवराज भालसिंग यांच्यामुळे प्रगतीपथावर आलेली आहे.

अवघ्या पाच महिन्यात या नवनिर्वाचित सरपंचांनी गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामविकासाची कामे मार्गी लावली आहेत.

सैनिक नगर, यशवंत नगर आणि शेळके वस्ती या वाड्यांमध्ये भालसिंग यांनी कामे केली व गावातील येणे जाण्यासाठी मुख्य वेस बांधलेली आहे. त्यांच्या या कामांमुळे फार कमी वेळातच त्यांनी गावात लोकप्रियता मिळवली.

त्यांच्या या लोकप्रियतेमुळे, गावावर आपली सत्ता टिकणार नाही या भीतीमुळे विरोधकांनी भालसिंग यांचा सरपंच पदाचा राजीनाम्याचा नाट्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या विषयी सरपंच भालसिंग यांनीं खुलासा केलाय.

गावकरी म्हणाले की सरपंचानी राजीनामा दिला तर गाव पुन्हा ३० वर्ष मागे जाईल या भीतीने, सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले.

तसेच ग्रामस्थांनी भालसिंग यांच्या कामात कोणी अडथळे आणल्यास त्याला गावकरी सुधरणायची ताकत ठेवणार आहे अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिलाय.

यावेळी सैनिक नगर, यशवंत नगर आणि शेळके वस्ती या तिन्ही वाड्याम्नाधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24