अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपचे स्थलांतर शहरातील शिक्षण संस्था, मंदिर-मस्जिद व पोलिस लाईनजवळ होत आहे.

या शॉपला येथे परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा दारुबंदी आंदोलनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अकोले रोडच्या सावतामाळी नगरमध्ये तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपीचे स्थलांतर होत आहे. या परिसराला राष्ट्रीय महामार्ग, बायपास, बस स्थानक, शिक्षण संस्था,

पोलिस लाईन, मंदिरे, मस्जिद, प्रतिष्ठित उपनगरे, हॉस्पिटलचा वेढा आहे. मात्र दुकानाचे चालक, जागा मालक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांचे उल्लंघन करत शॉप सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

शॉपजवळ धार्मिक स्थळे आहेत. बीएड कॉलेज, पेटीट हायस्कूल आहे. या वाईन शॉपला परवानगी देऊ नये, अशी मागणी दारुबंदी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष ॲड. रंजना गवांदे, सदस्य नामदेव घुले, हेरंब कुलकर्णी, ॲड. मिनानाथ शेळके, ॲड. प्राची गवांदे, ॲड. संदीप नलावडे, नंदा वाणी स्थानिकांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office