अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-ब्रेक दि चेनच्या माध्यमातून सरकारने करोना प्रतिबंधासाठी घातलेले निर्बंंध लॉकडाऊन इतकेच कडक झाले आहे.
आता प्रत्येक व्यवसायीकाला स्वतःची करोना चाणची किंवा करोनाची लस घेतलेली असणे आवष्यक असून तसे न केल्यास सबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.
करोना निर्बंधाच्या पार्श्वभुमिवर पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी काही महत्वपूर्ण निर्णय जारी केले आहे. यामध्ये कोरोनाचा वेगाने होणार फैलाव लक्षात घेता आता प्रत्येक व्यवसायीकाला स्वतःची करोना चाणची किंवा करोनाची लस घेतलेली
असणे आवश्यक असून तसे न केल्यास सबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.
सोमवारी शासकिय विश्रमागृहावर घेतलेल्या बैठकीप्रसंगी तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे,
घनश्याम बळप हे उपस्थित होते. यावेळी बोलताना देवरे म्हणाल्या, ब्रेक दि चेनच्या माध्यमातून सरकारने करोना प्रतिबंधासाठी घातलेले निर्बंंध लॉकडाऊन इतकेच कडक झाले आहे.
आता प्रत्येक व्यवसायीकाला स्वतःची करोना चाणची किंवा करोनाची लस घेतलेली असणे आवश्यक आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठीच नागरीकांनी घराबाहेर पडावे अशी प्रशासनास अपेक्षा आहे.
दिवसभर जमावबंदी तर रात्री संचारबंदी असून शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन असेल. या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंची दुकाणे उघडी राहतील मात्र त्यांच्या डिलीव्हरी बॉयमार्फत सबंधित ग्राहकांपर्यत त्या वस्तू ग्राहकाच्या घरी पोहचवाव्या लागतील.
डिलीव्हरी बॉयची देखील करोना चाचणी केल्याचा अहवाल सबंधितांकडे उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, स्वतःबरोबरच इतरांची देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ठ केले.