अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे स्थापनेला येत्या 16 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भूजलाबाबत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण व कार्यशाळेद्वारे माहिती देणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार राज्यातील 50 हजार पदवी, पदव्युत्तर भूगर्भशास्त्र, भूगोल, कृषी विषयात आवड असणार्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्हयातील ग्रामपंचायत, ग्राम पाणीपुरवठा समिती, महिला बचत गट, पाणी वापर संस्था, युवा व युवती तसेच राष्ट्रीय सेवा योजना,
नेहरू युवा केंद्र, जलसाक्षरता केंद्र, सेवाभावी संस्था अशा विविध संस्थेतील 50 हजार इच्छुक व्यक्तीनाही भूजल व भूजल व्यवस्थापनाची माहिती दिली जाणार आहे. भूजल विभागामार्फत औरंगाबाद विभागातील 34 हजार नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ठाणे विभागातील 12 हजार, नाशिक विभागातील 23 हजार, अमरावती विभागातील 20 हजार, पुणे विभागातील 29 हजार, नागपूर विभागातील 22 हजार नागरिकांचे उद्दीष्ट्ये ठरविण्यात आले आहे. आत्तापर्यत 956 नागरिक वेबिनारमध्ये सहभागी झाले असून या सर्वांनी माहिती घेतली आहे.
पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भूजलाचे महत्व वाढविण्याच्या उद्देशाने वेबिनार घेण्यात येत आहे. वेबिनारमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे भूजलाच्या पुनर्भरणावर नागरिकांनी भर दिल्यास भूजल पातळीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.