अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बरोबर असलेल्या काही लोकांमुळे पराभव झाला आहे.
आमदार रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी आमचा बळी देण्यात आला असून याचे आत्मपरीक्षण सर्वानाच करावे लागणार आहे. असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व मिनाक्षीताई साळुंके यांनी व्यक्त केले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकित कर्जतमधून साळुंके व पिसाळ यांच्यात काट्याची लढत झाली. यात पिसाळ यांचा अवघ्या एका मताने विजय झाला.
त्यातच आमदार पवार यांनी ही निवडणूक प्रेतिष्ठेची केली होती. त्यामुळे हा पराभव साळुंके यांच्या जिव्हारी लागला आहे. ते म्हणाले की,
तालुक्यातील नेत्यांचे फसवाफसवीचे राजकारण पुन्हा समोर आले आहे. आमच्यातील फंदफितुरी मुळेच पराभव झाला असून, बरोबर राहून फसवणूक करणाऱ्याचा आता शोध घ्यावाच लागणार आहे.
असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व मिनाक्षीताई साळुंके यांनी व्यक्त केले असून, हारजीत ही होतच असते असे म्हणत बरोबर राहणाऱ्याचे आभार मानले मानले आहेत.