ताज्या बातम्या

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २७ हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-   राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला तीन महिने पूर्ण झाले आहेत.

अद्यापही संपावर कोणताच तोडगा निघाला नाही. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ऐसी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल राज्यातून २७ हजार १९२ संपकरी एसटी कर्मचारी कामावर परतले आहे.

या कर्मचाऱ्यांसह खासगी चालकांच्या मदतीने एकूण ८ हजारहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. तसेच २५० पैकी २४४ आगार अंशतः चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

एसटीच्या संप काळात खासगी वाहतूकदाराने प्रवाश्यांची मोठी लूट केली. यामुळे प्रवाशी देखील त्रासले होते, मात्र एसटी संप अद्यापही संपायची नाव घेताना दिसून येतं नाही आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारीपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २७,१९२ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

एकूण ६,४२६ कर्मचारी बडतर्फ झाले असून ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तर ७८७६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, संपकाळात सरकारच्या दडपशाहीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या ८० आत्महत्या झाल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Maharashtra