जिल्ह्यातील या तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील वासंदे येथील शेतकरी तुकाराम गोविंद ठाणगे यांच्या २००० कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्या नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रविवारी दुपारी केली.

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समिती सभापती काशिनाथ दाते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस.के.तुंबारे यांनी रविवारी वासुंदे गावात बर्ड फ्लूची लागण झालेल्या चेमटे यांच्या या कोंबडी शेडला भेट देऊन पाहणी केली. तसेच या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात असणाऱ्या व पायमोडे यांच्या देखील शेड मधील सहा हजार कोंबड्यांची पिल्ले नष्ट करण्याचा प्रक्रिया चालू केली असून,

यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची आठ पथके तैनात करण्यात आलेली आहे. तर तीन महिने एक किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून, शासकीय अनुदान या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24