‘या’ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसात तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली

असून मागील दोन दिवसात बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.

या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले असून तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकासह ४ कर्मचारी तसेच

नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांना देखील कोरोनाने घेरले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यात मागील काही दिवसात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील ८ जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील ४० ते ४५ जणांचे बळी घेतले आहेत.

यामध्ये राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकऱ्यांचा समावेश आहे. आमदार बबनराव पाचपुते, अनिल पाचपुते लालासाहेब फाळके,

श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी कोरोनावर मात केली. मात्र आ. पाचपुते यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाआण्णा पाचपुते, व्यावसायिक सतिश पोखर्णा हे कोरोना विरूद्धची लढाई हरले आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24