अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- देवळाली प्रवरा शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.डास प्रतिबंधात्मक उपाययोजनाची फवारणी होत नसल्याने शहरातील दवाखन्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

पालिकेचेचा ठेकेदार उंटावरुन शेळ्या हाकत आहे.शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे.गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे.वाढलेल्या डासांमुळे देवळाली प्रवरा शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी शहरवासिय सामना करीत आहेत. रुग्णालयात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

पालिकेचा ठेकेदार माञ स्वच्छता बरोबरच गवत काढुन फवारणी केल्याचे सांगत असला तरी नागरीक म्हणतात फवारणी झालीच नाही.नगर पालिकेत सध्या अंधाळ दळतंय आणि कुञ पिठ खातंय अशी आवस्था झाली आहे. देवळाली प्रवरा शहरातील नागरीक साथी आजाराने ग्रस्थ झाले आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील मोकळ्या जागेत व गटारींवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवतामुळे डासांची उत्तप्ति होऊन ते घरात घुसून चावणे, पिण्याच्या पाण्यावर बसने आदी प्रकाराने नागरिक त्रस्त आहे.त्यामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहे.

टायफाइड, मलेरिया, चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी शहरवासिय सामना करीत आहेत. पालिकाचा ठेकेदार दररोजची स्वच्छता पलिकडे काहीच करीत नाही. सध्या साथीचे आजार असतानाही ठेकेदाराने औषध फवारणी करताना दिसला नाही. नागरीकही ठेकेदारा बाबत तक्रारी करीत आहे.

माञ पालिका ठेकेदाराकडे दुर्लक्ष करीत आहे. “स्वच्छता अभियानात राज्यात आदर्श काम करणाऱ्या पालिका हद्दीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, गोचीड तापाची साथ सुरु आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नाही.

प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. फवारणी करण्यास सांगितले आहे ;निकत देवळाली प्रवरा शहरात डास प्रतिबंधक फवारणी करण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहे. फवारणी चालू आहे. कुठला भाग फवारणीचा राहिला असल्यास निर्दशनास आणून द्यावा.तेथे हि फवारणी करण्याच्या सुचना देण्यात येतील आसे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

फवारणी केल्याचे दाखवल्यास सत्ताधारी गटाला व मुख्याधिकारी यांना बक्षिस देवू :-थोरात शहरातील श्रीमंता पाठोपाठ गरीब हि साथीच्या आजाराने ग्रासला गेला आहे.कोरोना महामारीमुळे रोजगार गेला आहेच.त्यातच साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे साथीच्या आजाराला संपुर्ण कुटुंबेच बळी पडले आहेत.

नगरपालिका प्रशासन ठेकेदाराला फवारणी करण्याचे सांगते परंतू ठेकेदार दोनशे कि.मी. वरुन उंटावरुन शेळ्या हाकीत आहे. शहरातील कोणत्याही भागात फवारणी केल्याचे दाखवून द्यावी.सत्ताधारी व मुख्याधिकारी यांना बक्षिस देवू असे आरपीआय जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.