अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने शाळेतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, नराधम मुख्याध्यापकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली.
याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच विद्यार्थिनीवर होत असल्याच्या अत्याचाराच्या घटनेमुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे.नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे.
त्यामुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. यानंतर त्या आरोपीला नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत एका जागरूक नागरिकाने ‘चाईल्ड हेल्पलाइन 1098’ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दिली. पोलीस दलाने या तक्रारीची गंभीर दखल घेत हा तपास महाबळेश्वर पोलिसांकडे वर्ग केला होता.
पाच दिवस तपास करून पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीचा शोध घेतला. तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नराधम मुख्याध्यापक दिलीप ढेबे याच्या मुसक्या आवळल्या.