अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राज्यातील कोणत्याही कोविड रूग्णालयात ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नाही. मात्र सोशल मीडियावर फेक न्यूज व अफवा पसरवून वातावरण खराब करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा
आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री आदित्यानाथ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एक उच्चस्तरीय बैठकीत,
औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर व अफवा पसरवून वातावरण बिघडवण्यांचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एनएसए आणि गँगस्टर अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्यातील कोणत्याही कोविड रूग्णालयात ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नाही. समस्या काळाबाजार आणि साठेबाजीची आहे, ज्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.
आम्ही आयआयटी कानपूर, आयआयएम लखनऊ आणि आयआयटी बीएचयू सोबत मिळून ऑक्सिजनचे एक ऑडिट करणार आहोत, जेणेकरून त्याची व्यस्थित देखरेख होऊ शकेल.
प्रत्येक बाधित व्यक्तीस ऑक्सिजनची गरज लागत नाही, यासंबंधी जागृती करण्यासाठी माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.