अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता प्रशासनाकडून सर्वोतपरी उपाययोजना केल्या जात आहे.
यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देखील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची ऑक्सिजनची होणारी वणवण थांबणार आहे.
ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
येत्या १५ जूनअखेर शेवगावात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात येऊन तो कार्यान्वित केला जाणार असल्याचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी सांगितले.
गुरुवारी चाकण (पुणे) येथील ब्राईज केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पथकाने शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे येऊन जागेची पाहणी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयांच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या दहा ठिकाणी दररोज १०० ऑक्सिजन सिलिंडर तयार होतील, एवढी क्षमता असणार आहे.