पडळकरांना त्यासाठी आमदारकी दिली आहे ! आमदार रोहीत पवार यांची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत पवार कुटंबावर व राष्ट्रवादीवर टीका केली जात असून, राष्ट्रवादीवर टीका करण्यासाठीच त्यांना आमदारकी दिली असेल. भाजपाच्यावतीने ते चांगले काम करत आहेत.

मात्र भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. अशी अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

शेवगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आमदार पवार हे आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, सध्या राज्यसह देशावर कोरोनाचे गंभीर संकट आहे. त्यातून सरकार मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा राष्ट्रवादी पुढाकार घेऊन मदत कार्य करते. काळ कठीण आहे. शेती, व्यवसाय क्षेत्र मोठ्या अडचणीत आहे.

सध्या काम करण्याची खुप इच्छा आहे मात्र इच्छा असूनही राज्य सरकारला विकासकामे करता येत नाही अशी खंत देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24