पद्मश्री पवार म्हणतात ‘हा’ तालुका भाग्यवान आहे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुका भाग्यवान असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नंतर कोरोना काळात आ. नीलेश लंके केलेल्या कामामुळे पारनेरचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे.

मी आर.आर.पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक गावांत काम केले आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक पक्षाला सामाजिक चेहऱ्याची गरज असते, त्यामुळे मंत्रीपद मागण्याची गरज नाही.

सामाजिक काम करताना सुरुवातीला विरोध होतो. कोरोना काळात लोकांच्या मनातील भीती काढण्याचे काम आ. नीलेश लंके यांच्याप्रमाणे आम्हीही केलं आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, दिव्यांगांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम लंके प्रतिष्ठानने केले आहे.

असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी पवार बोलत होते. आ. लंके म्हणाले, २८ जून २०११ पासून आरोग्य व रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात असून, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.

गोरगरीब व गरजूंना मदत करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले आहे. ही एक सामाजिक संस्था असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या मतदारसंघात काम करण्याची मला संधी मिळाली आहे. मतदार संघात काम करण्यासाठी त्यांचा फार मोठा फायदा झाला असल्याचे आ.लंके म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24