पद्मश्री राहिबाई पोपेरे यांची राष्ट्रीय समितीवर निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-बीजमाता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहिबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या

प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर निवड करण्यात आलेली आहे.

त्यांच्या निवडीसंदर्भातील नुकताच ई-मेल प्राप्त झालेला आहे, अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली.

याबाबत पत्रकात साठे यांनी सांगितले, की डॉ. टी. के. नागरत्ना रजिस्ट्रार प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट कृषी विभाग, भारत सरकार यांनी या निवडीचे पत्र पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना पाठवले आहे.

देशपातळीवर दरवर्षी सुमारे ८५ लाख रुपये किमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमाने निवडण्यात आलेल्या शेतकरी, संस्था व व्यक्तींना दिले जातात. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण व याच विभागामार्फत केली जाते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोले तालुक्याचे नाव चमकवलेल्या बीजमाता राहिबाई यांची या समितीवर निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या गरीब हातांना मिळालेला न्याय म्हणता येईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

या अगोदरही राष्ट्रीय पातळीवर राहीबाई यांनी केलेल्या गावरान बीज संवर्धनाची दखल घेत भारत सरकारने त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्यांच्या कार्याचे महत्व व आवश्यकता लक्षात घेऊन तसेच त्यांचे या विषयातील पारंपारिक ज्ञान व त्यावर असलेले प्रभुत्व यांचा विचार करून या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24