PAN Card News : आजकाल फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. तसेच सध्या अनेकजण ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत आहेत. पॅन कार्डद्वारे आजकाल अनेक संस्था कर्ज देत आहेत. त्यामुळे तुमच्याही पॅनकार्डवर कोणी कर्ज घेतले आहे का? हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
पॅनकार्डवर फसवणुकीने कर्ज घेतले तर पीडितेच्या क्रेडिट स्कोअर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही कधी तुमच्या पॅनकार्डचा नंबर कधीही शेअर करू नये. तसेच त्याबद्दल कोणतीही गोपिनीय माहिती कोणालाही देऊ नये.
तुम्हीही कधीही कोणत्याही कारणास्तव पॅनकार्ड आणि आधार कार्डच्या झेरॉक्स देत असाल तर ते तुम्ही कशासाठी देत आहेत हे देखील लिहून द्यावे जेणेकरून
तुम्ही दिलेल्या झेरॉक्स चुकीच्या कामासाठी वापरल्या जाऊ नयेत.
तुम्ही जर तुमच्या पॅनकार्डचा नंबर कोणाला शेअर केला किंवा तो सामायीक केला तर तुमच्या देखील पॅनकार्डवर दुसरा व्यक्ती कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही फसवणुकीचे बळी ठरू शकता. तसेच तुमचे आर्थिक नुकसान होऊ क्रेडिट स्कोअर देखील खराब होईल.
तुम्हालाही तुमच्या पॅनकार्डवर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे का? हे तपासायचे असेल तर तुम्ही घरबसल्या सहज सोप्या पद्धतीने तपासू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सहज तुमच्या पॅनकार्डवर कर्ज आहे का? हे तपासू शकता.
पॅन कार्ड तपशील कसे तपासायचे?
प्रत्येक व्यक्तीचा पॅन त्यांच्या बँक/वित्तीय संस्थांच्या खात्यांशी जोडलेला असतो.
त्यामुळे एखादी व्यक्ती ज्या संस्थेकडून कर्ज घेते ती ही माहिती नियमितपणे क्रेडिट ब्युरोसोबत शेअर करते, जी ते त्यांच्या सिस्टममध्ये अपडेटही करतात.
क्रेडिट रेटिंग कंपन्या पॅनवर थकित कर्जाची माहिती मिळवू शकतात.
अशा अनेक वेबसाइट्सवर लॉग इन करून कोणीही त्यांच्या कर्जाच्या स्थितीचा मागोवा ठेवू शकतो. ही अॅप्स आणि वेबसाइट वापरकर्त्यांना त्यांचा CIBIL स्कोर तसेच रिअल टाइममध्ये कर्जाची माहिती देतात.
घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तपासा
अनेकदा तुम्हाला सिबिल स्कोअर तपासण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही देखील सतत तुमचा सिबिल स्कोअर तपासणे गरजेचे आहे. तुमच्या पॅनकार्डवरील कर्ज तपासायचे असेल तर CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark सारख्या क्रेडिट ब्युरोपैकी कोणत्याही क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही सहज तपासू शकता. तसेच तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर आणि कर्जाचे तपशील पाहू शकता.