Budget 2023 : आता ‘या’ कामासाठी गरजेचे नसणार पॅनकार्ड, वाचा सविस्तर

Budget 2023 : पॅनकार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक आर्थिक कामासाठी आता पॅनकार्ड गरजेचे आहे. नवीन पॅनकार्ड बनवणे आता खूप सोपे झाले आहे.

लोकांना आता  MyGov Helpdesk WhatsApp chatbot द्वारे डिजीलॉकरवरून आधार कार्ड तसेच पॅन कार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्रे सहज डाउनलोड करता येत आहेत. अनेक खाती आधारशी जोडलेली आहेत त्यामुळे काही बँकांनी सरकारकडे पॅन कार्डची अट काढून टाकावी अशी विनंती केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत प्रशासनाला निवेदने प्राप्त झाली आहे. त्यांची सध्या तपासणी सुरु आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 206AA नुसार, ज्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन प्रदान केले जात नाही ते सध्या 20 टक्के कर वजावटीवर (TDS) देय आहेत.

बँकां करत आहेत ही मागणी

सध्याच्या व्यवस्थेमुळे निर्माण होणारा गोंधळ आणि अनावश्यक डुप्लिकेशन दूर करण्यासाठी काही बँकांना आयकर कायद्यात बदल हवे आहेत.त्यांच्या मतानुसार, आधार क्रमांक सर्व वैयक्तिक खात्यांमध्ये प्री-लोड केलेला असतो. आयकर कायद्याच्या कलम 139A(5E) अंतर्गत काही व्यवहारांसाठी ग्राहक पॅन कार्डऐवजी आता आधार क्रमांक देऊ शकतात, असे त्यांचे मत आहे.

या विषयावर पुढे आता पॅन गरजेचे नाही. अहवालानुसार, कलम 206AA विशिष्ट व्यवहारांमध्ये त्यांचे पॅन कार्ड प्रदान करण्यात अयशस्वी झालेल्या संस्था किंवा व्यक्तींकडून कर टाळण्यास प्रतिबंध करते.

तसेच TDS योग्य दराने लागू होईल याची हमी देते. या प्रकरणावरील स्पष्टीकरण PAN च्या आवश्यकतेतून सूट मिळालेल्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.तरीही काही व्यवहारांमध्ये जास्त कर कपातीच्या अधीन असू शकते.