वाहनधारकांमध्ये घबराट ; चोरटयांनी लांबविल्या 3 दुचाकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे.

शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. खंडाळा (ता. नगर) शिवारातील अमोल दिलीप कांडेकर यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच 16 एएन 5205) चोरीला गेली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मळू भिवसेन ससे (वय 35 रा. ससेवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार पठाण करीत आहे. तसेच दुसरी घटना नगर शहरातच घडली आहे.

नगर मार्केट यार्डच्या कार्यालयासमोरून सोमवारी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान निलेश कचरू शिंदे (वय 30 रा. केडगाव) यांची दुचाकी (एमएच 16 एएफ 9801) चोरीला गेली. शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुढील तपास पोलीस नाईक दाणी करीत आहे. तसेच तिसरी घटना देखील नगर शहर परिसरातच घडली आहे. नागापूर एमआयडीसीतील अंकुर इंजिनिअरिंग वर्कस समोरून प्रल्हाद बाळू म्हस्के (वय 23 रा. मिरी ता. पाथर्डी) यांची दुचाकी (एमएच 16 बीएस 2944) चोरीला गेली. म्हस्के यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सुर्यवंशी करीत आहे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24