अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेेते दिलीप गांधी यांच्या सारखे प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नसल्याचे मोठे दु:ख होत आहे. नगरमध्ये आल्यावर त्यांच्या कडून होणारे आदरतिथ्य कायम स्मरणात राहील.
ऑक्टोबर महिन्यात दसरा मेळावा आटोपून मी नगरमार्गे पुण्याला जाताना दिलीप गांधी यांची झालेली माझी शेवटची भेट. आज ते नसले तरी मी गांधी परिवाराबरोबर कायम असणार आहे,
अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी स्व. दिलीप गांधी यांच्याघरी जाऊन त्यांच्या कुटुबियांचे सांत्वन केले.
सरोज गांधी, सुवेंद्र व देवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी स्व. गांधी यांच्या अनेक जुन्या घटना व कार्यक्रमांच्या आठवणींना पंकज मुंडे यांनी उजाळा दिला.
याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवराज पोटे, दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी स्व.दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून सरोज गांधी, सुवेंद्र व देवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.