संगमनेर परिसर चित्रीकरणा साठी” नंदनवन”…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- भारतीय चित्रपट निर्मितीच्या प्रारंभा पासून आज पर्यंत विविध भाषेतील सिनेमा निर्माते, दिग्दर्शकांना निसर्गाच्या कुशीतील मनोहारी भंडारदरा परिसराने गीतांच्या चित्रीकरणासाठी मोहित केले आहे.

येथे चित्रित केलेल्या मधुमती, गंगा जमना, जुवेल थिफ, कटी पंतग,आशिक, व राम ‘तेरी गंगा मैली इत्यादी अनेक सिनेमातील अवीट अविस्मरणीय गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील चित्रपट निर्माते राम परसया , दिग्दर्शक हर्षद कर्डक यांनी संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळील सह्याद्रीच्या उंच शिखर पायथ्याशी “सावरगाव घुले” या निवांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावाची निवड करून

“आकडा” हिन्दी चित्रपटाच्या शूटिंग करीता प्रथम पसंती दिली आहे. या चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशातील मुफ्तपूर गावात आकडा टाकून विजेची चोरी करण्यार्या ग्रामस्थांची कथा अत्यंत विनोदी ढगांनी साकारली आहे

“वीरगढ’ नावाने खेडे वसवून जून महिन्यात सलग 15 दिवसात चित्रिकरण पुर्ण् करण्यात आले. चित्रपटात संगमनेर शहरातील कलावंत अभिनेते व दिग्दर्शक उल्हास आढाव यांनी प्रमुख भूमिका केली आहे.

याशिवाय विकास खेडकर, सुरेन्द्र गुजराथी, सर्वेश जोशी, शेरमोहम्मद रंगरेज यांचा अभिनयातील सहभाग महत्वाचा आहे. संगीतकार सलील मोहन यांनी पार्श्वगायक सोनाली पटेल,श्रीपर्ण चॅटर्जी, अक्षय, व कुलदीपसिंग

यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेली गाणी श्रवणीय आहेत “आकडा” शीर्षक गीत तरुणाईला नक्कीच आकर्षित करेल. सिम्मी दीक्षित, रवी देवधर, विभावरी देशपांडे, विजय कौशिक या सिनेकलावंताच्या भूमिका उल्लेखनीय आहेत.

परिसरातील रसिकांनी शुटिंग बघण्यास प्रचंड गर्दी केली होती. संगमनेरचे मा. नगरसेवक किशोर कालडा यांनी संगमनेर येथील कलावंतांचा परिचय करून दिला. सावरगाव घुले सरपंच परशुराम घुले यांनी संपूर्ण सिनेमा युनिटला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

सर्व कलावंताचे आभार प्रदर्शन केले. संगमनेर परिसरात सिनेमा, दूरदर्शन तसेच चित्रीपट निर्मितीसाठी कलावंताना सहकार्य करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिले त्याच बरोबर सिनेमा युनीटला शुभेच्छा दिल्या.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे, राजेश मालपाणी, हिरालाल पगडाल, नंदकिशोर आढाव, नितीन जोर्वेकर, सदाशिव थोरात, भगवंतराव मोरे, इंद्रिस शेख,चंद्रमोहन हंगेकर, डॉ.जगदीश देशपांडे, संजय अकोलकर व अंजली तपाडीया,

शुभदा खेर, विद्या साताळकर आदीनी “आकडा” चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलावंताचे सावरगाव घुलेची निवड केल्या बद्दल धन्यवाद देऊन चित्रपट यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24