पालकांनो आता मुलीच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका; बँकेची हि खास योजना जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप… मात्र आजही देशात अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आली कि तिच्या पालकांना ती ओझे असल्याचे वाटते. यामुळे स्त्री जन्मास नाकारले जाते. मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्ह्यातील एका बँकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा तालुक्‍यात आगामी वर्षात (8 मार्च 2021 ते 8 मार्च 2022) जन्म घेणाऱ्या मुलींसाठी शहरातील रोडे अर्बन मल्टिपर्पज बॅंकेने एक लाभदायक माहिती समोर आणली आहे.

बॅंकेचे अध्यक्ष संतोष रोडे म्हणाले, श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घसरला आहे. मुलींचा जन्मदर वाढला तरच भविष्य उज्ज्वल आहे.

त्यासाठी रोडे अर्बन मल्टिपर्पजने एक राजकन्या नावाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्‍यात पुढच्या 8 मार्चपर्यंत (2022) जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावे आमची बॅंक स्वत: एक एफडी करणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे; जाणून घ्या :- योजने अंतर्गत लाभधारक मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पन्नास हजार रुपये मिळतील. ज्यांच्याकडे केशरी व पिवळी शिधापत्रिका आहे, त्यांनाच या योजनेत भाग घेता येईल.

त्यामुळे सामान्यांना योजनेचा फायदा मिळेल.” यादरम्यान जन्म घेणाऱ्या मुलीचा जन्मदाखला व आई-वडिलांचे छायाचित्र दिले, की योजनेत त्या मुलीचा समावेश होईल, असेही रोडे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24