पारनेर तालुक्यातील जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथे होणाऱ्या इमारत भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मोठा बदल करण्यात आला असून कार्यक्रम पत्रिका पुन्हा नव्याने छापण्यात आली आहे.
जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथील काळाचौकी येथे इमारत भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पद्मश्री पोपटराव पवार व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे नाव टाकण्यात आले होते.
परंतु पारनेरचे असलेले महानगर बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी आमदार निलेश लंके यांच्या नावाला स्थान न दिल्यामुळे सोशल मीडिया मधून उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान या बाबत सोशल मिडीयात जोरदार चर्चा सुरु असून आमदार निलेश लंके यांना ट्रोल करण्यात येत आहे, पारनेर तालुक्यातीलच शिवसेना ह्या फेसबुक ग्रुपवर ही याबाबत पोस्ट टाकण्यात आली आहे यात लिहिले आहे कि,
आमचं पारनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधीचे पहिल्या पत्रिकेत नाव नव्हते तर ती ” रुसून ” बसल्यामुळे दुसरी ची पत्रिका छापावा लागली ! रूसके लोकप्रतिनिधी..
जी.एस. महानगर बँकेचे चेअरमन उदय शेळके हे पारनेर तालुक्यातील असल्याने पारनेर तालुक्यातील आमदारांना या पत्रिकेवर स्थान न दिल्यामुळे आमदार निलेश लंके समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली.
त्यामुळे जी.एस. महानगर बँकेचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन असलेले उदय शेळके यांना महानगर बँकेच्या इमारत भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अखेर मोठा फेरबदल करावा लागला असून पुन्हा पत्रिका नव्याने प्रसिद्ध करावी लागली आहे.