अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली पंधरा वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तालुक्याच्या विकासाच्या अनेक संकल्पना आपण मांडून पूर्णही केल्या.
शिवसेनेने घालून दिलेल्या संस्कारांवर पक्षाचे पदाधिकारी मिळालेल्या संधीचे सोने करीत पदाचा सद्पयोग करीत आहेत, याचे आपणास समाधान असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले.
तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी बोलत होते. या वेळी जि.प.चे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते, पं. स. सभापती गणेशराव शेळके,
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, शिवसेना युवा तालुकाप्रमुख नितीन शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी वडनेर बुद्रुक,
वाजेवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधण्यासाठी १४.९९ लाख रु. व जनसुविधा योजनेंतर्गत १३.५० लाख रुपये खर्चून स्मशानभूमी विकास करणे, या कामांचा समावेश आहे. श्री. औटी पुढे म्हणाले,
गेल्या सहा – सात महिन्यांपूर्वी वाजेवाडी व वडनेर बुद्रुक येथील स्मशानभूमी व बंधाऱ्याच्या कामांचे आश्वासन जि.प.चे सभापती काशिनाथ यांनी दिले होते, आज ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे. श्री.दाते व पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना शिवसेनेने पदाची संधी दिली,
या संधीचा ते सद्पयोग करीत असल्याचे आपणास समाधान असून, कोरोना संपल्यानंतर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी करीत असलेल्या कार्याचा आढावा आपण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे औटी यांनी सांगितले.