अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवकांनी पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर विद्यार्थी सेनेचे परेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना राकेश जाधव,
अनमोल रामनानी, ऋषिकेश खांडरे, गणेश भिंगारदिवे, आदर्श तिवारी, आशुतोष शिंदे, सार्थक साळुंखे, पुष्पक गोयल, नवनाथ खांडरे, प्रशांत साळुंखे आदीसह असंख्य कार्यकर्तेचा प्रवेश करण्यात आला यावेळी सचिव नितीन भुतारे, गजेंद्र राशिनकर, विनोद काकडे,
दीपक दांगट, गणेश मराठे, अनिता दिघे, गणेश शिंदे, संतोष साळवे, पोपट पाथरे आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेश पुरोहित म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग जोडला जात आहे.
समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच पुढाकार राहिला असून, विकासासाठी कटिबध्दपणे कार्य करीत आहे.
प्रश्न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे परेश पुरोहित त्यांनी सांगितले.