प्रवाश्यांनो सावधान; बसस्टॅन्ड परिसरात लुटारुंच्या टोळ्या सक्रिय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटना अद्यापही सुरूच आहे. यातच शहरातील माळीवाडा व पुणे बस स्थानका बाहेर प्रवाशांना लुटणार्‍या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत.

लुटीच्या घटना वाढत असताना कोतवाली पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. नगर शहरातील माळीवाडा, पुणे बस स्थानक परिसरात पुणे, नाशिक, बीड,

औरंगाबाद जिल्ह्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रवाशी बस किंवा खाजगी वाहनांची वाट पाहत थांबलेेले असतात.

याचा फायदा रस्त्यावर लूट करणारे घेतात. प्रवाशांना कारमध्ये बसून त्यांना निर्जन स्थळी नेत मारहाण करत लुटमार केली जात असल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे भामटे बळजबरीने त्याच्याकडील पैसे, मोबाईल, एटीएम कार्ड काढून घेतले जाते. मोबाईलमधील फोन पे चा पासवर्ड विचारून त्यातील रक्कम ट्रान्सफर केली जाते.

माळीवाडा बस स्थानक परिसरात अशा लुटीच्या घटना वारंवार होऊन देखील याकडे कोतवाली पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. नुकतेच असे काही प्रकार या बस स्थानक परिसरात घडले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24