अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-नगर – रेशिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य रेवजी मल्हारी पवार यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
स्व.रेवजी पवार यांच्या पश्चात पत्नी, माजी नगरसेवक बाळासाहेब व नय्यर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार ही दोन मुले, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.पवार यांनी बायजाबाई व ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केेली. शिस्तप्रिय स्वभावामुळे शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविला.
धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार निर्माण केला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.