देशभक्तीवर असलेल्या ‘या’ भारतीय सिनेमाला पाकिस्तानात बंदी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  भारत देशाच्या शौर्यगाथेवर आधारित अनेक बॉलिवूड सिनेमे भारतात आजवर प्रदर्शित झाले आहे. यातच या सिनेमांना प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती मिळाली आहे.

नुकताच असाच एक देशभक्तीपर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे लीड रोल असलेल्या ‘शेरशाह’ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्य आणि बलिदानाची ही कहाणी आहे.

या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांचा जुळा भाऊ विशाल बत्रा यांचाही रोल केला आहे. हा सिनेमा भारत पाकिस्तानच्या युद्धावर आधारलेला असल्याने स्वाभाविकच त्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, सिनेमाचे अनेक व्हिडीओ यू-ट्युबवर पोस्ट करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ बघूनच पाकिस्तानातील प्रेक्षकांनी हा सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही प्रेक्षकांनी या सिनेमाची एखादी व्हिडीओ लिंक शेअर करण्याची विनंतीही कॉमेंटमध्ये केली आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे माता-पिता देखील हा सिनेमा बघून खूप भावूक झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24