३१ मार्चपर्यंत कर्ज भरा, पुन्हा कर्ज देऊ …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ बेलवंडी सहकारी सेवा संस्थेला नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे आणि जिल्हा बँकचे नूतन संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेने स्वभांडवलातून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संस्थेच्या कार्यालय इमारतीचे पाहणी केली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे तसेच जिल्हा बँकचे नूतन संचालक राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा भैरवनाथ सेवा संस्थेचे अध्यक्ष जयसिंग लबडे, उपाध्यक्ष स्वप्नील घोडेकर यांनी सन्मान केला.

कानवडे म्हणाले, जो शेतकरी डिसेंबर महिन्यात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करील त्या शेतकऱ्याला मार्च २०२२ पर्यंत पुन्हा कर्ज दिले जाईल.

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ संस्थेने नुकतीच सुमारे दीड कोटी रुपये खर्च करत स्वभांडवलातून उभारलेल्या संस्थेच्या कार्यालय इमारतीचे पाहणी करत भैरवनाथ सेवा संस्थेची इमारत ही जिल्ह्यातील पहिली अद्ययावत इमारत असल्याचे सांगत संस्थेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी उपसरपंच उत्तमराव डाके, श्रीगोंदे खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाणे, माजी उपाध्यक्ष दिनेश इथापे, अरुणराव डाके, माउली शेलार, शंकर काळाने,

नारायण चोभे, संभाजी वैद्य, शेषराव काळाने, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष निखिल क्षीरसागर, सचिव बाळासाहेब ढवळे व संचालक उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24