नागवडे सहकारी साखर कारखान्याचे पेमेंट जमा : अध्यक्ष राजेंद्र नागवडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे सन २०२०-२१ या हंगामातील गळीत केलेल्या उसाचे बिलापोटी २०० रुपये प्रतिटना प्रमाणे दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.

सन२०२०-२१ या हंगामात कारखान्याचे ७ लाख २ हजार ५०७ टच उसाचे गाळप केले असून प्रथम हप्ता २१०० रुपये प्रतिटनाप्रमाणे वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित अंतिम पेमेंट ऊस उत्पादकांना त्वरित अदा करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली.

कारखान्याच्या आर्थिक अडचणी बाबत लोकांकडून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. परंतु सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवाना कारखाना कारभाराची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण विश्वास आहे.

स्व. बापुंच्या विचाराने व संस्कारांने कारखान्याची वाटचाल सुरू असलेल्यने शेतकरी सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी यांच्या खात्यावर सुमारे १४ कोटी रुपयांचे ऊस पेमेंट वर्ग करण्यात आले असून गळीत हंगाम २०२०-२१ रुपये कोटी अदा करण्यात आले असून कामगारांचे पगार ही नियमित होत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24