ताज्या बातम्या

मोती बातमी ! तोपर्यंत एसटी महामंडळात नोकरभरती बंद राहणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- तोटय़ात असलेले एसटी महामंडळ, करोना आणि संप कालावधीत झालेले नुकसान यामुळे महामंडळाने खर्च कपातीसाठी नवीन भरतीवर निर्बंध घातले आहे.

जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. एसटी महामंडळाला २०२०-२१ मध्ये ४ हजार १३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.

तर खर्च ५ हजार ८६६ कोटी रुपये होता. तर संचित तोटा ७ हजार ९९ कोटी रुपये झाला. २०२१-२२ मध्ये ६ हजार ८९० उत्पन्न असून १० हजार १९८ खर्च झाला आहे.

त्यामुळे संचित तोटय़ातही तेवढय़ाच प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत संचित तोटय़ात वाढच होत गेली. यामध्ये करोनामुळे उत्पन्नावर परिणाम होतानाच गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले.

होणारे नुकसान, तोटा यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला शासनाकडूनच मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून राहावे लागले.

त्याचा परिणाम महामंडळाच्या भरती प्रक्रियेवरही झाला. विलीनीकरणाच्या मागणीनंतर नेमलेल्या तीन सदस्य समितीचा अहवाल सादर झाला आहे.

या अहवालात महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि खर्चात कपात करण्यासाठी नियोजन सादर केले आहे. खर्च कपातीमध्ये नवीन बस खरेदी करताना त्या सीएनजी इंधनावर घेणे, भाडेतत्त्वावर नवीन बसचा समावेश करणे यासह महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचे नियोजन केले आहे.

Ahmednagarlive24 Office