टॉयलेटला गेलात तर होणार दंड; या कंपनीचा अजब गजब फतवा;

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-संपूर्ण जगाला कोरोना नावाच्या रोगाने पछाडले आहे. त्यातून चीनमधील एक कंपनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

या कंपनीने मर्चाऱ्यांना जो आदेश दिलाय तो ऐकून तुम्हाला हसावे की रडावे ते कळणार नाही. तर तुम्ही कंपनीने असा काय आदेश दिलाय तो ऐकून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल.

तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत,कंपनीने असा काय आदेश दिला आहे. चीनमधील कंपनीने असा आदेश दिला आहे की कर्मचारी आळशी असतात.

त्यामुळे ते एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेट मध्ये जातात. पण त्यांनी हे टाळावे म्हणून कंपनी त्यांच्यावर दंड करू इच्छित आहे. कर्मचारी जर एकपेक्षा जास्त वेळाब्रेक घेत असतील तर त्यांच्यावर दंड आकारण्यात या असं कंपनीचे म्हणणे आहे.

या कंपनीचे ना अंपु इलेक्रॉनिक्स सायन्स अँड टेक्नोलोंजि आहे. एक वेळेपेक्षा जास्त वेळा कर्मचारी टॉयलेटला गेला तर त्याला २० युआन दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांची अशी वागणूक शिस्तीविरोधात असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडून असा दंड आकारण्यात आला त्यांना तो परत देण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24