Fixed Deposit : मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली तर आकारला जातो दंड? धक्कादायक माहिती आली समोर

Fixed Deposit : पैशांची गरज कधी भासेल ते सांगता येत नाही. म्हणून अनेकजण गुंतवणूक करत असतात. याच गुंतवणूकदारांसाठी एफडी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय असून अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात.

परंतु, एफडीचेही काही नियम आणि अटी असतात त्या माहिती असणे खूप गरजेचे आहे. यापैकी एक म्हणजे जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी एफडीमधून पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागतो. आणि हा दंड प्रत्येक बँकांचा वेगवेगळा असतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकजण FD मध्ये पैसे गुंतवून आवश्यकतेनुसार मुदतपूर्तीपूर्वी काढतात. परंतु, मुदतपूर्तीपूर्वी एफडीवर पैसे काढण्यासाठी बँक दंड आकारते. अशातच आता रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ तसेच बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे.

त्यामुळे गुंतवणुकीची ही चांगली संधी आहे. अनेक एफडीमध्ये, गुंतवणूकदारांना मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय देण्यात येतो. तरीही तुम्हाला काही दंड भरावा लागतो.

आयसीआयसीआय बँक

ICICI बँकेतून 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी आणि प्री-मॅच्युअर रक्कम काढली तर तुम्हाला त्या एफडी व्याजावर एकूण 0.5 टक्के दंड भरावा लागेल. तर 5 कोटींहून अधिकच्या एफडीसाठी 1.5 टक्के दंड भरावा लागतो. तसेच पाच वर्षे किंवा त्याहून अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी 1 टक्के दंड भरावा लागतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया

SBI बँकेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या FD मध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला एकूण 0.5 टक्के दंड भरावा लागेल. तर गुंतवणुकीची रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 1 टक्के दंड आकारला जाईल. हे लक्षात घ्या की सात दिवसांच्या एफडी ठेवीवर बँक कोणतेही व्याज देत नाही.

बजाज फायनान्स आणि महिंद्रा फायनान्स बँक

या दोन्ही बँकांतीन महिन्यांपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देत नाही. जर तुम्ही एफडी बंद केली तर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही. तर सहा महिन्यांनंतर मुदतपूर्व पैसे काढले तर तुमच्याकडून 2 ते 3 टक्के व्याज दंड आकारला जातो.