शिक्षकांचे प्रलंबित वेतन शिक्षकदिनापूर्वी अदा करावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन शिक्षक दिनापूर्वी अदा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन वेळेवर होत नाही.

राज्यातील काही विभागातील शाळा यांचे वेतन तर दोन-दोन महिने उशिरा होत आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. तसेच 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मंत्रालयातून योग्य वेळेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करून वेतन निधी मंजूर करून घेतला आहे.

त्याचे तातडीने वितरण मुंबईसह राज्यातील सर्व विभागात झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर यांचे वेतन शिक्षक दिनापुर्वी होऊ शकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पाच सप्टेंबर पूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन होण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावर आदेश निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24