लोक मरतायत मात्र सुविधांसाठी आमदार बसले सरकारी यंत्रणेच्या भरोवश्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-आपल्या मतदारसंघात आरोग्य सुविधांची काय परिस्थिती आहे, हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना माहीत असते. वेळोवेळी आढावा घेताना आरोग्य सुविधा हा एकमेव विषय बैठकांच्या पटलावर असतो.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आमदारांनी कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना केल्या. अशा कठीण परिस्थितीत आमदारांनी सांगण्याची वेळ का यावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जिल्ह्यातील परिस्थिती भयाण आहे, यामुळे काही लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढाकार घेऊन आपापल्या मतदार संघात आरोग्य यंत्रणा बळकटीकारणासाठी सरसावले आहे. पारनेरच आमदार नीलेश लंके यांनी एक हजार बेडचे सेंट उभारले आहे.

आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये ३५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. अकोल्याचे आमदार लहामेटे यांनी आगस्ती मंदिरात कोविड केअर सेंटर सुरू केले. आमदार कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण आरोग्य केंद्राला ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.

अशा संकट काळात या आमदारांनी मदतीचा हात पुढे केला. बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.

जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. या मंत्र्यांनी आपले कोविड केअर सेंटर अजून तरी सुरू केलेले नाही. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करतात. त्यांच्या मतदारसंघात थोरात यांनी अजून तरी कोविड सेंटर सुरू केलेले नाही.

आमदार आशुतोष काळे हे कोपरगावचे नेतृत्व करतात, त्यांनी स्वत: कोविड केअर सेंटर सुरू केले नाही. नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांनी त्यांच्या राहुरी मतदारसंघात सेंटर सुरू केलेले नाही.

जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांनीही त्यांच्या नेवासा तालुक्यात स्वत:चे कोविड केअर सेंटर सुरू केलेले नाही. आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सेंटर सुरू केलेले नाही.

नगर तालुका श्रीगोंदा, राहुरी नगर आणि पारनेर या तीन मतदारसंघात विभागलेला आहे. तीन आमदार असून एकाही आमदाराने या तालुक्याचा साधा आढावादेखील घेतला नसल्याचे सांगण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24