ऑक्सिजन अन‌् रुग्णालयात जागा नसल्याने मशिदीत सुरू केले कोविड सेंटर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-गुजरातमधील कोरोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. वडोदऱ्यामधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथील मशिदीमधील व्यवस्थापनानेच सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने जहांगीरपूर (वडोदरा, गुजरा) येथील एका मशीदमध्येच मशीद व्यवस्थापनाच्या पुढाकाराने ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या सेंटरमध्ये रुग्णांना ऑक्सिजनपासून जेवणापर्यंतच्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी रुग्णवाहिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे गुजरातमधील फोटो काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते.

यासंदर्भात राज्य सरकारने खुलासा करताना सरकारी रुग्णालयांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच करोना रुग्णला दाखल करुन घेताना काही नियमांचे पालन करावे लागते

त्यामुळे उशीर होत असावा असंही सरकारकडून सांगण्यात आलं. ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने आम्ही मशिदीमध्ये कोव्हिडी सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

रमजानच्या महिन्यात यापेक्षा पवित्र काम करता येईल, अशा शब्दांत या मशिदीच्या ट्रस्टींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24