Budget facts : आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अनेकांच्या नजर त्यावर टिकून आहेत. काही देशांमध्ये कर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. महागाईच्या तोंडावर बजेटकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. देशात लागू केलेल्या आयकर प्रणालीबद्दल सर्वांनाच माहिती आहे.
भारतात लोकांच्या उत्पन्नानुसार कर घेतला जातो. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की जगात असेही देश आहेत, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. यामागचे कारण काय? त्या सरकारांकडे देश चालवण्यासाठी पैसा कुठून येतो, ते जाणून घेऊयात सविस्तर..
1. संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE हा आखाती प्रदेशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असून येथील अर्थव्यवस्थेची ताकद पर्यटन आणि तेल आहे. या देशातील नागरिकांना कर भरावा लागत नाही.
2. ब्रुनेई
ब्रुनेई हा देश जगातील दक्षिण पूर्व आशियामध्ये येतो. हा देशही तेलाचा साठा असलेल्या देशांपैकी एक आहे. या इस्लामिक राज्याच्या लोकांनाही आयकर भरावा लागत नाही.
3. कुवेत
कुवेतही आखाती प्रदेशात येतो. हा तेल निर्यात करणारा मोठा देश असून या देशातील लोकांनाही आयकर भरावा लागत नाही.
4. मालदीव
मालदीवला एक लोकप्रिय पर्यटन स्थळही म्हटले जाते. भारताशिवाय इतर देशांतूनही अनेक लोक मालदीव येथे भेट देतात.
5. बहरीन
बहरीन या देशाचे नागरिक त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरत नाही. .
6. कतार
कतार हा देखील देश तेल क्षेत्रातही बलाढय़ आहे. महत्त्वाचे म्हणजे तो लहान असूनही खूप श्रीमंत मानला जातो. येथील लोकही आयकर भरत नाहीत.
7. मोनाको
मोनाको हा युरोपातील लहान देश आहे. हा देश जरी लहान असला तरी तेथील नागरिकही आयकर भरत नाहीत.
8. बहामास
बहामासच्या नागरिकांनाही कसलाच आयकर भरावा लागत नाही.
9. नौरू
जगातील सर्वात लहान बेट राष्ट्र असलेल्या नौरूचे क्षेत्रफळ फक्त ८.१ चौरस मैल इतकेच असून येथील नागरिकही कर भरत नाहीत.
10. केमन बेटे
केमन बेटे उत्तर अमेरिका खंडात येतात, हे बेट पर्यटकांमध्ये लोकप्रिय असून हा देश आयकरमुक्त आहे.
11. सोमालिया
सोमालिया देशातील नागरिकांकडून कर वसूल केला जात नाही.
12. ओमान
ओमान हा आखाती देशांपैकी एक असून तेथील नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. याचे मोठे कारण तेल आणि वायू क्षेत्रातील ताकद आहे.