रुग्णवाहिका हलताना लोकांनी पाहिले ; पोलिसांनी तपासणी केल्यानंतर समजले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे अनेक रुग्णांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे कोरोनामुळे सध्या सर्वत्र रुग्णवाहिका मिळणं ही कठीण झालं आहे.

एकीकडे रुग्णांना योग्यवेळी रुग्णवाहिका मिळत नसताना त्यातच अश्लील प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये समोर आली आहे.

वाराणसीच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुजाबाद चौकी परिसरात हा लज्जास्पद प्रकार सुरू होता. येथे एका रुग्णवाहिकेमध्ये एक तरुणी आणि तीन तरूण अश्लील चाळे करत होते.

भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाऊन येथून या चौघांनाही अटक केली असून रुग्णवाहिकाही ताब्यात घेण्यात आली आहे.

सुजाबाद परिसरात एका निर्मनुष्य ठिकाणी रुग्णवाहिका हालत असल्याचे काहींना दिसून आले. भरपूर वेळापासून ती रुग्णवाहिका तिथेच थांबून होती आणि सतत हलत असल्यानं लोकांची सटकली आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.

त्यामुळे काहींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला.

पोलिसांनी आल्यानंतर बंद रुग्णवाहिकेतून तीन तरुण आणि एका तरुणीला बाहेर काढले. या चौघांसह रुग्णवाहिकाही ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तीन तरुण आणि या तरुणीविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चौघांनाही सध्या जेलची हवा खावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल या चौघांनाही अटक करण्यात आली आहे आणि संबंधित रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे, असे एसीपी प्रवीण सिंह यांनी सांगितले. गंगा सेवा धाम नावाच्या एका रुग्णालयाची ही रुग्णवाहिका आहे.

ती सध्या एका तरुणाला भाड्यानं चालवण्यासाठी दिली आहे, असेही पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या रुग्णवाहिका सर्वत्र धावतानाच दिसून येत असताना

ही एक रुग्णवाहिका बराच वेळ एकाच ठिकाणी आणि तेही निर्मनुष्य ठिकाणी उभी होती तसेच ती हलत असल्यानं परिसरातील लोकांना शंका आली आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.p

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24