अंकशास्त्र हा शब्द सर्वानीच ऐकला असेल. या शास्त्रात अंकाला जास्त महत्व आहे. अंकाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. काही अंक आपल्यासाठी शुभ असतात आणि काही अंक अशुभ असतात.
अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 या अंकांचे वर्णन आपणास सापडते. तसेच या अंकावर काही ग्रहांचे वर्चस्व असते असेही मानले जाते. येथे आपण अंक 6 बद्दल बोलणार आहोत, म्हणजेच ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूळ अंक 6 आहे.
ज्यांचा मूलांक 6 आहे ते लोक खूप रोमँटिक असतात आणि कला, संगीत आणि अभिनय क्षेत्रात चांगले नाव कमावतात. ते लोक आयुष्यात खूप नाव आणि पैसा कमावतात. आलिशान आयुष्य जगायलाही त्यांना आवडतं. चला जाणून घेऊया अंक 6 शी संबंधित लोकांचे गुण आणि वैशिष्ट्ये…
आयुष्यात भरपूर नाव आणि पैसा कमवतात- अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूळ अंक 6 आहे ते आयुष्यात भरपूर नाव आणि कीर्ती कमावतात. पण त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. आलिशान आयुष्य जगायलाही त्यांना आवडतं. या लोकांचे छंद महाग असतात. त्यांना कंजुषी आवडत नाही.
रोमँटिक आणि मजेशीर-ज्या लोकांचा मूलांक 6 आहे ते रोमँटिक असतात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. हे लोक आकर्षक असतात. तसेच या लोकांना म्हातारपण उशिरा येते. त्यांना कलेची खूप आवड आहे. त्यांना प्रवास करण्याची आवड असते. हे लोक थोडे गमतीशीरही असतात.
या क्षेत्रात खूप नाव कमावतात-ज्यांचा मूलांक 6 आहे ते लोक आर्ट, मॉडेलिंग, म्युझिक, आर्ट, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात हे लोक चांगले नाव कमावतात. तसेच बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर लक्झरीयस वस्तूंचा बिझनेस या लोकांसाठी यशस्वी ठरतो. याशिवाय सोने, चांदी, हिरे, दागिने, कपडे, लक्झरी वस्तू, खाद्यपदार्थ, हॉटेल आदींशी संबंधित कामे शुभ असतात. यासोबतच साखर, शुक्राणू किंवा हृदयाशी संबंधित आजारही त्यांना त्रास देऊ शकतात.