अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- आज बकरी ईदसाठी मुंबई येथील देवनार कत्तलखान्यात मोठ्या जनावरांची कत्तल करण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती.zz
मात्र काल मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत सध्या कोरोनाकाळात कोणत्याही धार्मिक सणा पेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. असे सांगून हायकोर्टाने मुंबई महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे .
तर दुसरीकडे भिवंडी निझामपूर महापालिकेला देखील दणका दिला आहे. येथील महापालिकेने बकरी ईद निमित्त तीन दिवसांसाठी तात्पुरते कत्तलखाने सुरू करण्यास परवानगी दिली होती, मात्र न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिली आहे.
याबाबत प्रदुषण नियामक मंडळ, पशुवैद्यकीय विभाग आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही पालिका आयुक्तांनी याबाबत परवानगी दिलीच कशी असा सवाल यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला आहे.