अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या वादात मला पडायचे नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार ज्योती देवरे यांची महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींवर आरोप करीत आत्महत्या करण्याचा इशारा ध्वनिफीतीद्वारे दिला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी हजारे यांची भेट घेतली. देवरे यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल दाखवला. तर देवरे यांनीही रविवारी हजारे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती.
आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, अशी अपेक्षा तहसीलदार देवरे यांनी हजारे यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केली.
आमदार नीलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे या दोघांचेही म्हणणे आपण ऐकून घेतले. मात्र, मला या वादात पडायचे नाही. हा प्रशासकीय चौकशीचा भाग आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. तहसीलदार देवरे यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवल्याने हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.