अहमदनगर जिल्ह्यातील पालकमंत्र्यासह लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेळेत वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने वाढत आहे अशी गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून कोरोना महामारी मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना कुठल्याच प्रकार चे वैद्यकीय सेवेची पूर्तता होत नसल्याने अनेक कोरोना ग्रस्तां चे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे.

या सर्व नागरिकांच्या मृत्यूस  जबाबदार धरून पालकमंत्री यांच्यासह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

या मुंडन आंदोलन प्रसंगी श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की , गेल्या अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

या कोरोना महामारी मध्ये अनेक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, ज्यांना बेड मिळाले त्यांना इंजेक्शन. ऑक्सीजन मिळत नाही, अनेक तालुक्यांमध्ये तर व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही, कोरोना रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने अनेकांचे मृत्यू होत आहे.

एकाच घरातील दोन ते पाच पाच रूग्ण मृत्यमुखी पडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नगर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री व जिल्ह्याचे इतर दोन मंत्री खासदार,आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व सर्व ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून मतदार राजा रुग्णांना कुठल्याही प्रकारची मदत व सहकार्य मिळत नाही.

म्हणून कोरोनामुळे अनेक नागरिकांचे मृत्यू झालेले आहे. या मृत्यूस जबाबदार म्हणून पालक मंत्री यांच्यासह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. यासाठी व मतदार राजे चे सरकार मायबाप मेले असे वाटत असल्याने त्यांचा श्राद्ध घालून आजचे मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.

आजच्या मुंडन आंदोलनाची दखल घेऊन कोरोना ग्रस्त लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना लोकप्रतिनिधींनी यापुढे मदत न केल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधी च्या घरासमोर जाऊन मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्व लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी.

असे आंदोलन प्रसंगी श्री बाबासाहेब शिंदे म्हणाले. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष गणेश दिवशी, शहर अध्यक्ष सचिन पाळंदे, कामगार सेना तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर,

शेतकरी सेना तालुका अध्यक्ष गोरक्ष वेळे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर,शहराध्यक्ष विशाल शिरसाट, कामगार सेना उपचिटणीस नंदू गंगावणे, तालुका संघटक भास्कर सरोदे, शहर संघटक निलेश सोनवणे, अमोल साबणे, चिटणीस ईश्वर जगताप, शहर उपाध्यक्ष राजू शिंदे,

शहर सरचिटणीस रोहित गुंजाळ, शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, संतोष आवटी, सचिन जाधव, विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय सूर्यवंशी, उपशहर अध्यक्ष संकेत शेलार, प्रमोद शिंदे, मृत्युंजय रुद्राक्ष राहुल शिंदे, विभाग अध्यक्ष मारुती शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24