अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे.

शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे.

निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, अनिल शर्मा, सुधीर पगारिया आदींची नावे आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, मतदान केंद्रानिहाय लसीकरण केंद्रांची निर्मिती करावी, केंद्राच्या कार्यक्षेत्रातील बुथनिहाय कुटुंबांचे सर्वेक्षण करावे,

लसीकरण मोहिमेत ६० वर्षे वयाच्या नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, लसीकरणाचा डेटा दर्शवणारे पुणे मनपाच्या धर्तीवर पोर्टल / डॅशबोर्डच्या विकसित करावा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24